पुणे-(कात्रज) दि.16, पुणे प्रतिनिधी – राम कराड
माधवराव शिंदे शिक्षण संस्था संचलित आनंदी पब्लिक स्कूल कात्रज येथे दिनांक 14 व 15 डिसेंबर दरम्यान शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाळेच्या प्राचार्य सीमा बिरादार यांनी दिली.
आनंदी पब्लिक स्कूल मधून उद्याचे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने संस्थेचे अध्यक्ष शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्रिन्सिपल सीमा बिरादार यांच्या नियोजनाखाली दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते.यावर्षी देखील या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
संस्थेचे अध्यक्ष शंकर शिंदे सर,सकाळचे पत्रकार अशोक गव्हाणे,पुढारीचे पत्रकार रवी कोपनर,लोकमतचे पत्रकार किरण घोरतळे,सुनील पानसरे,राम कराड,अशोक कदम,पालक वर्ग तसेच शाळेच्या प्रिन्सिपल सीमा बिरादार यांच्या हस्ते मोठया दिमाखात स्पर्थचे उद्धाटन करण्यात आले.
यावेळी उपप्रिन्सिपल कविता मॅडम, क्रीडा प्रमुख पूजा बिरादार मॅडम,शिवकन्या होणराव,प्रियंका डांगी,स्वप्नाली कासार मॅडम,सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी,पालक तसेच खेळाडू मोठ्या संख्येने हजर होते.
सर्व शिक्षक तसेच विद्यार्थीं ग्रीन,ऑरेंज,ब्ल्यू व यलो या चारहाउसेस मध्ये विभागले जातात.शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये,ॲथलेटिक्स स्पर्धेबरोबर,लिंबू चमचा,बटरफ्लाय रेस,बेडूक शर्यत,अडथळा शर्यत, सशाची शर्यत अशा विविध स्पर्धा,आयोजित केल्या होत्या.प्ले ग्रुप पासून इयत्ता 5 वि पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवला.
स्पर्धाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष शंकर शिंदे सर,प्रिन्सिपल सीमा बिरादार क्रीडा संचालक,सर्व शिक्षक वृंद,कर्मचारी,आदी काम पाहत होते.
कोट-
SPORTS DAY 2024
DAY 1,What an amazing day! Our school hosted a thrilling Annual Sports Day on 14th & 15th December,and it was an absolute blast!
Ravi Kopnar Sir,Ashok Ghawane sir,Principal Seema Biradar Madam,Parents and All Staff graced the event with her presence.
Sports day for kindergarten was a vibrant event featuring exiting races like Butterfly race,frog race, hurdle race, rabbit race showcasing their energy and coordination.
Incredible display of athleticism,team spirit and determination was witnessed from our students in Anandi Public School
From track to field events to team sports,our young athletes gave it all,making us immensely proud.The day was filled with exciting moments,celebrations of sportsmanship and unforgettable achievements.
Director:-
Shankar Shinde sir,