पुणे सर्व्हेअर यूनिट तर्फे इलेक्ट्रिक व्हेईकल, इन्शुरन्स, वायू प्रदूषण यावर चर्चासत्राचे आयोजन….
उपाध्यक्ष विशाल कोडुलकर यांचा पुढाकार…
पुणे प्रतिनिधी – रामेश्वर कराड
पुणे दि.17 :- पुणे सर्व्हेअर युनिटच्या माध्यमातून शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 वार शनिवार रोजी इलेक्ट्रिक व्हेईकलवर भारतातील पहिल्यादाच ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन पुण्यातील सर्वेअर यूनिटच्या माध्यमातून करण्यात आले.भारतातील हे पहिले सर्व्हेअर युनिट आहे की ज्यांनी इलेक्ट्रिक व्हेईकलवर ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन केले.
या चर्चासत्रा च्या माध्यमातून ऑनलाईन सर्व माहिती देण्यात आली. पुणे सर्व्हेअर युनिटच्या माध्यमातुन माध्यमातून इलेक्ट्रिक व्हेईकल, व्हेईकलचे फायदे- तोटे, इलेक्ट्रिक व्हेईकल इन्शुरन्स मार्गदर्शन , व्हेईकल वापरण्यासंदर्भातील सूचना तसेच संपूर्ण वाहन मालकांना आपल्या इन्शुरन्स बाबत कशी काळजी घ्यावी व अपघातानंतर इन्शुरन्सचा वापर केव्हा व कसा करावा, शहरातील वाढते प्रदूषण व इलेक्ट्रिक वाहनांची भूमिका याविषयी सविस्तर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले.या ऑनलाइन चर्चासत्रासाठी आय.आय.टी मद्रास येथील प्रोफेसर व त्यांची टीम यांच्या ऑनलाइन लाइव उपस्थितीमध्ये इलेक्ट्रिक वाहनावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त अधिक सर्वेअर तसेच अनेक नामांकित इन्शुरन्स कंपन्या यांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.यावेळी पुणे सर्वेअर यूनिटचे उपाध्यक्ष विशाल कोडुलकर साहेब आणि इंगळे साहेब महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हे चर्चा सत्र पार पडले. यावेळी त्यांनी सांगितले की पुण्यातील सर्वेअर टीम ही प्रत्येक वेळी इन्शुरन्स व नवनवीन तंत्रज्ञानाविषयी,इलेक्ट्रिक वाहन,वायु प्रदूषण व उपाय याविषयी विविध माहितीचे प्रसारण करत असते यामध्ये नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने इन्शुरन्स कंपनी व इलेक्ट्रिक व्हेईकल यांच्या विषयी तसेच वायू प्रदूषणावर योग्य उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळते.
यावेळी बोलताना विशाल कोडुलकर यांनी सांगितले की भविष्यात देखील अशा वेगवेगळ्या चर्चासत्राचे आयोजन आम्ही करणार आहोत, यामधून सर्वेअर बांधवांचे व नागरिकांच्या ज्ञानात अधिक भर पडेल व इन्शुरन्स, अपघात, इलेक्ट्रिक वाहने, पुणे शहरातील वाढते प्रदूषण व मानवी जीवन, प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि इलेक्ट्रिक व्हेईकलची प्रदूषणावरची भूमिका याविषयी संपूर्णपणे सविस्तर माहिती या चर्चासत्रात दिली गेली.