मार्केट यार्ड परिसरात बोगस माथाडी कामगारांचा सुळसुळाट?
डमी कामगार उभे केल्याचा माथाडी कामगारांकडून केला जातोय आरोप.
पुणे : पुणे शहरातील सर्वात मोठी असणारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजारो कोटींची उलाढाल होते.महाराष्ट्रातील विविध शहरातून तसेच परराज्यातून देखील विविध प्रकारचा माल, अन्नधान्य मार्केट मध्ये दाखल होते ते वाहनां मधून उतरवणे व चढवणे यासाठी हमाल असतात. यांची देखील नोंदणी केली जाते अशी माहिती मिळते परंतू प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रकार मार्केट यार्ड परिसरात पहायला मिळत आहे.मार्केट यार्ड भागातील हमालावर अन्याय होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून, कित्येक वर्षापासून नव्हे तर पिढ्यानपिढ्या हमालीचे काम करणारे मूळ हमाल यांना डावलून नवीन हमालाची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्ड परिसरामध्ये मुळ हमालीचे काम करणाऱ्या हमालावर उपासमारीची वेळ आली आहे.
चक्क अनोंदणीकृत कामगार उभे करून काम केले जात असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.यामुळे खऱ्या नोंदणी केलेल्या कामगारांना काम मिळत नसून त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे. सध्या अशा प्रकारे 90 टक्के बोगस कामगार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.सकाळी घरातून कामासाठी आल्यानंतर संध्याकाळपर्यंत काम न मिळाल्याने कामगारांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माथाडी बोर्ड, हमाल पंचायत, मार्केट कमिटी यांचे सभासद असून देखील कामगारांना याप्रकारे अन्याय सहन करावा लागत असल्याचा आरोप कामगार करत आहेत. दिवस दिवस नोंदणी असलेल्या कामगारांना काम मिळत असून नाक्यावरून 600/700 रुपयांमध्ये बोगस कामगार आणून त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे.व जाब विचारल्यास दमदाटी देखील करण्यात येत आहे असा आरोप माथाडी कामगार युवराज कुमकर व टोळी क्रमांक पाच चे हमाल यांनी केला आहे त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात यावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील त्यांच्या कडून देण्यात आला आहे.
