Explore

Search

July 12, 2025 1:13 pm

July 12, 2025 1:13 pm

IAS Coaching

कोळोसे गावात कृषी दिन उत्साहात साजरा

कोळोसे गावात कृषी दिन उत्साहात साजरा

रायगड :- रायगड भूमित शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोली (महाड) येथील कृषिदूतांनी कोळोसे गावात ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दिन मोठ्या उत्साहात संपन्न केला.

कृषीदूतांनी गावकऱ्यांना कृषी दिनाचे महत्त्व पटवून दिले व कृषीदूत म्हणजे नक्की काय? हे त्यांना समजावून सांगितले. त्याचबरोबर कोळोसे गावातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कृषी तज्ञांनी आधुनिक शेती बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचा शेवट वृक्षारोपण करून करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री. धीरज तोरणे उपस्थित होते. तसेच कोळोसे गावच्या सरपंच संजना पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी आकाश रुपनर, पोलिस पाटील संदीप पाटील, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक बेले सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर सर, कार्यक्रम अधिकारी एस. एस.संकपाळ सर, सहाय्यक प्राध्यापक वाघमोडे सर, ग्रामसेवक चंद्रकांत कदम, तसेच कोळोसे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोलीचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापिका व्ही.आर. पवार, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस. एस. संकपाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली हे कृषिदूत कोळोसे गावामध्ये प्रात्यक्षिक राबवत आहेत. कृषि महाविद्यालय मोहोप्रे- आचळोली येथील कृषिदूतांमध्ये गौरव विश्वकर्मा, मानव पाटील, रामचंद्र ठणके, रोहन चव्हाण, विपुल हगवणे, प्रतिक जाधव, युवराज सुर्यवंशी, समीर न्हावेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

M51 News
Author: M51 News

Leave a Comment

Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
AI Tools Indexer