दहावी 2005 व बारावी 2007 च्या बॅच चा स्नेह मेळावा थाटात संपन्न..
अधिकारी, पोलीस, शिक्षक, उद्योजक पदावर विद्यार्थ्याची भरारी…
शिक्षकांकडून कौतुकाची थाप…
पत्रकार – रामेश्वर कराड
पुणे/बोधेगाव:- श्री शिवाजी हायस्कूल बोधेगाव या विद्यालयांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला.सन 2005 इयत्ता दहावी व सन 2007 इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून सर्व गुरुजनांचे स्वागत करण्यात आले.यावेळी गुरुजनांचा सत्कार देखील करण्यात आला.यावेळी विविध जिल्ह्यातून कार्यरत असलेले माजी विद्यार्थी,अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक, शिक्षक, अशा अनेक पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित झाले होते.यावेळी सर्व शिक्षकांची व माजी विद्यार्थ्यांची नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मित्र परिवार एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमासाठी गुरुवर्य श्री नजन सर, पोटफोडे सर, अकोलकर सर, गुरुवर्य श्री पाठक सर, गुरुवर्य श्री कासुळे सर,गुरुवर्य श्री वांढेकर सर,आदर्श शिक्षिका गोरे मॅडम आदी शिक्षक गुरुजन वर्ग उपस्थित होते.या स्नेह मेळाव्या कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी सर्व गुरुजनांचा आलिम पिंजारी सर व किरण घोरतळे सर यांच्या वतीने यांच्या वतीने सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री किरण घोरतळे सर यांनी सांगितले की कार्यक्रमाचे आयोजन करताना सर्वांना एकत्रित येताना खूप आनंद झाला सर्व मित्र परिवार एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. जिवन जगत असताना या आनंदाचा निश्चितपणे उपयोग होईल, तसेच जुन्या मित्र मैत्रिणींना भेटून एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नजन सर यांनी सांगितले की दहावी सन 2005 व बारावी सन 2007 च्या या बॅचचा आम्हाला मनस्वी आनंद होतो की या बॅचच्या मुलांनी स्वकर्तृत्वावर आपले व शाळेचे नाव उंचावले आहे.भविष्यात सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला, संस्थेला व गोरगरीब मुलांसाठी योगदान देण्याचे आवाहन देखील पोटफोडे सर यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण तहकिक सर यांनी केले तर आभार प्रदर्शन हे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गरकळ साहेब यांनी केले.
