पुणे:- मांजरी बू.येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवजयंती निम्मित रक्तदान शिबिराचे आयोजन सूर्यमुखी गणपती मंदिर,मांजरी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात एकूण 176 रक्तदात्यांनी रक्त दान केले.याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते श्री.अभिजित पवार यांचे शिवव्याख्याण पार पडले.

याप्रसंगी,मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. समीर भाऊ घुले,श्री.पंकज भाऊ घुले,श्री.विशाल शिळमकर,श्री.संतोष सुमन,श्री.आशुतोष खत्री,श्री.विशाल शेलार,आदी.उपस्थित होते.शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मिळालेल्या सहकार्यासाठी समितीच्या वतीने श्री.विष्णू तहकिक,श्री.सुमित चिंचोले यांनी सर्वांचे आभार मानले.
