कात्रज – सातत्याने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या माय माउली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांना समाज विकास विभाग जागतिक दिव्यांग दिना निमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने सन्मानचिन्हे व गौरव पत्र देऊन गौरवण्यात आले.अनेक वर्षे अखंडपणे ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी आरोग्य सेवा देणाऱ्या विठ्ठलराव वरुडे पाटील यांना पुणे मनपाच्या वतीने गौरवपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी मा.नितीन उदास उपायुक्त समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका, मा.डॉ.राजेंद्र भोसले प्रशासक तथा महापालिका आयुक्त पुणे,मा.पृथ्वीराज बी.पी. अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका व दिव्यांग बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.यावेळी दिव्यांगांसाठी विविध क्षेत्रातील सेवाकार्य करणाऱ्या संस्थांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
