अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना राजस्थानी ३६ कोम समाजाचा पाठिंबा
हडपसर ( प्रतिनिधी ) :- हडपसर विधानसभा मतदारसंघातील सात राजकीय पक्ष व हडपसर मतदार संघातील राजस्थानी 36 कोम समाजाच्या वतीने अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने मतदारसंघातील वातावरण बदलण्याची चर्चा रंगली आहे.राजस्थानी समाजाच्या वतीने गंगाधर बधे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केला आहे त्यासोबत संघटनेमध्ये असलेले सर्व सभासद नागरिक मतदार यांना गंगाधर बधे यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
हडपसर मतदार संघात प्रचाराची यंत्रणा अंतिम टप्प्यात असल्याने राजकीय उमेदवारांना कंटाळून मतदारसंघातील प्रत्येक समाजातील नागरिक अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देताना दिसून येत आहे.अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना वाढता प्रतिसाद पाहून,ओबीसी बहुजन आघाडी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी,जनहित लोकशाही पार्टी,लोकराज्य पार्टी,ओबीसी एनटी पार्टी,मुस्लिम सेवा संघ या सर्व पक्षांची व संघटनांची आरक्षणवादी आघाडी च्या वतीने हडपसर विधानसभा मतदारसंघातील गंगाधर बधे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.एवढ्या मोठ्या संघटनेने व छोट्या-छोट्या पक्षांनी पाठिंबा दिला असल्यामुळे गंगाधर बधे यांच्या विजयाच्या शर्यतीत मोठी वाढ झाली आहे.