हडपसरच्या समस्या सोडविण्यासाठी निवडणुकीत उभा : गंगाधर बधे
कोंढवा, ता. १५: हडपसर मतदार संघामध्ये अनेक नागरी समस्या आहेत.गेल्या दहावर्षामध्ये वाहतूक कोंडी,पार्किंगचा प्रश्न,रस्त्यावरील फेरीवाले-पथारीवाल्यांचे पुनर्वसन, रामटेकडी मधील कचरा डेपो,मांजरीतील पिण्याच्या पाण्याची समस्या,अशा मूलभूत गरजांकडेच दुर्लक्ष मागील आमदाराने केले आहे. आता पुन्हा खोटे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केली जात आहे.त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी मी निवडणुकीत उभा आहे,” असे हडपसर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गंगाधर बधे म्हणाले.
बधे यांनी गुरुवारी शिंदे वस्ती,बीटी कवड़े रस्ता परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या.त्यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला.मतदारांनी बधे यांचे फटाके वाजवून स्वागत केले. लोकप्रतिनिधी नसताना बधे यांनी सर्वसामान्यांची सेवा केली आहे.त्यामुळे मतदार त्यांना नक्कीच संधी देणार,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यात्रा शेवकर वस्ती,शिंदे वस्ती,भीमनगर,गणेशनगर, वटोरमळा,मिलिंदनगर,साई पार्क, निगडे वस्ती,जाधव वस्ती,बीटी कवडे रस्ता,दळवीनगर,पिंगळे वस्ती परिसरातून जात मुंढवा गावठाणात समारोप झाला.यादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी बधे यांचे औक्षण केले.यावेळी नितीन निगडे,दत्ता जाधव,विजय पालवे, आशिष कवडे,राज गंगुळ, सूरज कांबळे,सत्यजित कवडे,अंकुश मोरे, गणेश वटारे,जयश्री हांडे व विमल परदेशी आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.