हडपसरमध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बधेचें पारडे जड
मी हडपसरवासीयांचा हक्काचा माणूस असल्याने प्रतिसाद :बधे
पुणे,कात्रज : हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचारार्थ रामटेकड़ी परिसरात पार पडलेल्या पदयात्रा व रोडशोला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.महिला,तरुण,ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वर्ग समूहातील नागरिकांना रॅलीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.”माझ्या प्रचाराला मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा मी हडपसरवासीयांचा हक्काचा माणूस असल्याने मिळत आहे.प्रत्यक्ष भेटीदरम्यान नागरिक आपल्या भावना व्यक्त करत असून,त्यांचा सकारात्मक प्रतिसाद यंदाच्या निवडणुकीचे समीकरणे बदलणार आहे,असा विश्वास बधे यांनी व्यक्त केला.
अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची रामटेकड़ी येथील साईबाबा मंदिर या ठिकाणाहून मंगळवारी रॅली पार पडली.ही रॅली रामनगर अंधशाळा, पुढे अण्णाभाऊ साठे उद्यानापासून भुयारी मार्गाद्धारे गोसावी वस्ती, म्हाडा कॉलनी,वैदुवाडी यानंतर पुढे शंकर मठ वस्तीमधून रॅली मगरपट्टा चौकातून हडपसरमध्ये आली.
रॅली मध्ये हडपसर मतदारसंघाचे दिग्गज ज्येष्ठ नेते महादेव बाबर,रामटेकड़ी प्रभाग प्रमुख यशवंत मंडलिक,सुरज चव्हाण,प्रेम कसबे,बालाजी उदारे, तुषार झोंबाडे,रवि तुजारे,तोसिफ पटेल,हर्षल मंडलिक सहभागी होते.
बधे यांचे योगदान मोठे
माजी आमदार महादेव बाबर यानी सांगितले,हडपसर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी राजकारण न करता सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. गोरगरीब गरजू लोकांना खूप मोठी मदत ते नेहमी करत आलेत. निष्ठावंत आणि हक्काचा माणूस अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना निवड़न देण्याचे मी आवाहन करत आहे.