पुणे दि.२५:- पुणे जिल्ह्यात उद्या दि.२६ रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.या पार्श्भूमीवर पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा आणि कॉलेजेसना गुरुवारी (२६ सप्टेंबर)सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यात उद्या ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेजच्या विद्याथ्थाच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकार्यांनी सुट्टीचा निर्णय जाहीर केला आहे.पुण्यात बुधवारी दुपारनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली, तीन तास झालेल्या या पावसानं पुण्याची अक्षरशः वाट लावली.
ठिकठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणीसाचल्यानं नागरिकांना यातून मार्ग काढणं अवघड बनलं होतं.तसंच दुपारपासूनच रात्री उशीरापर्यत बाणेर रोड,विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.उद्या देखील रेड अलर्ट मुळं हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते.त्यामुळं शालेय विध्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.