पुणे :- बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठणारे फोटो काल आरोपपत्रातून पुढे आले होते. या आरोपपत्रातील फोटो व्हायरल झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली.

या बैठकीत मंत्री धनंजय मंडे,प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थित.या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.ही माहिती समोर येताच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.या प्रकरणी मला काही बोलायचं नाही,असं ते म्हणाले.
