Explore

Search

April 20, 2025 9:20 am

April 20, 2025 9:20 am

IAS Coaching

अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना बारा बुलतेदारांचा पाठिंबा …..

अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना बारा बुलतेदारांचा पाठिंबा …..

हडपसर मतदार संघातील काही धनगर समाजांनी गंगाधर बधे यांना पाठिंबा जाहीर केला…

हडपसर मतदार संघातील विविध समाजाचा पाठिंबा मिळाल्याने अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांचा विजय निश्चित

हडपसर प्रतिनिधी – हडपसर विधानसभा मतदारसंघातील एकमेव अपेक्षा उमेदवार गंगाधर बधे यांची रॅली पदयात्रा पाहून मतदार संघामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मतदारसंघातील विविध समाजातील व काही बारा बुलतेदारांनी पाठिंबा दर्शवला असून अपक्ष गंगाधर बधे यांना वाढत्या मतदारांच्या प्रतिसादामुळे विजयाचा आलेख वाढला आहे. मतदार संघातील अपक्ष उमेदवारांमध्ये अव्वल नंबर वर असलेले गंगाधर बधे यांना लोकवस्त्या, रहिवासी सोसायटी मधील मतदारांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील एकीकडे दोन बलाढ्य पक्षांची चर्चा असताना अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी  केलेले सामाजिक काम सर्व धर्माच्या बांधवांना आपलेसे करून ठेवने, मतदार संघातील ज्येष्ठ नागरिक असो, गरीब कष्टकरी फेरीवाले पथारीवाले यांना मदत करणारा आपला हक्काचा माणूस म्हणून बधे अन्नाची चर्चा रंगली आहे. त्यामुळेच मतदार संघामध्ये कष्टकरी व बारा बलुतेदार मतदारांनी गंगाधर बधे यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला जात आहे. मतदारसंघातील  काही धनगर समाजाच्या अनेकांनी धनगर समाजातील मानाची असलेली घोंगडी आणि काठी भंडारा उधळून गंगाधर बदे यांना आशीर्वाद दिले आहेत. सिताराम कोळेकर यांनी सांगितले, गंगाधर बधे यांनी नेहमीच नागरिकांचे हित जपण्याचा काम केले, चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजामध्ये ओळख आहे. इतर राजकीय नेते केवळ वापर करून घेण्याचा प्रयत्न करतात, मतदारांची किंमत ही निवडणुकीपुरतीच असते, त्यामुळे विकास कामे करणारे व कष्टकरी वर्गाचे हित जपणारे गंगाधर बधे यांनाच निवडून द्यावे असे आवाहन सामान्य नागरिकांनी केले आहे.

पक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची पदयात्रा व बाईक रॅली…
शुक्रवारी कोंढवा बुद्रुक येथून पदयात्रा व बाईक रॅलीला सुरुवात झाली ही बाईक रॅली पुढे श्रीराम चौक टिळेकर नगर, सर्व गल्ल्या, केदारेश्वर नगर, पाण्याची टाकी, राजमाता कॉलनी, आर के कॉलनी, यानंतर गोकुळ नगर व त्या ठिकाणी सर्व गल्ल्या या भागांमध्ये संपन्न झाली. दरम्यान पदयात्रा व बाईक रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गंगाधर बधेयांना रस्त्यामध्ये थांबून विजयाचा आशीर्वाद दिला.

फोटो -अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची धनगर समाजाची घोंगडी काठी व भंडारा उधळून नागरिकांनी विजयाचे आशीर्वाद दिले.

M51 News
Author: M51 News

Leave a Comment

Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
AI Tools Indexer