Explore

Search

December 23, 2024 4:47 pm

December 23, 2024 4:47 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

लोकप्रतिनिधी नसताना कष्टकरी जनतेचा आवाज गंगाधर बधेच विजयी होणार ….

लोकप्रतिनिधी नसताना कष्टकरी जनतेचा आवाज गंगाधर बधेच विजयी होणार …..

पुणे-(हडपसर)
हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचार यात्रेने परिसर हादरून गेला आहे.गुरुवारी शिंदे वस्ती बी टी कवडे रोड परिसरामध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या, यावेळी मतदारांनी त्यांचे फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले. मागील दहा वर्षात बलाढ्य राजकीय पक्षाने हडपसर मतदार संघातील मूलभूत समस्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे मतदारसंघात अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी लोकप्रतिनिधीचे पद नसताना गोरगरिबांची केलेली सेवा यामुळे गंगाधर बधे यांनाच पाठिंबा वाढत असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली शेवकर वस्ती, शिंदेवस्ती भीम नगर, गणेश नगर, वटोरे मळा, मिलिंद नगर, साई पार्क, निगडे वस्ती, जाधव वस्ती, बीटी कवडे रोड, दळवी नगर, पिंगळे वस्ती व मुंढवा गावठाण या परिसरात पदयात्रा रॅलीचे समारोप करण्यात आले. बदे यांच्या पदयात्रेस भिम नगर बीटी कवडे रोड परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला. शेकडो युवक नागरिकांनी पदयात्रेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. जागोजागी महिलांनी गंगाधर अण्णा बधे यांना औक्षण करीत फटाक्याच्या आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले. यावेळी यापद यात्रेमध्ये नितीन निगडे, दत्ता जाधव, विजय पालवे, आशिष कवडे, राज गंगुळ, सुरज कांबळे, सत्यजित कवडे, अंकुश मोरे, गणेश वटारे, जयश्री हांडे व विमल परदेशी आदी मुख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

हडपसर मतदार संघातील मूलभूत समस्या कडे मागील दहा वर्षात राजकीय लोकांकडून दुर्लक्ष …..

अपक्ष गंगाधर बधे यांनी सांगितले , हडपसर मतदार संघात अनेक नागरि समस्या आहेत. मागील दहा वर्षांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवाराने सत्ता भोगले आहे. तरीसुद्धा या ठिकाणी वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न, रस्त्यावरील फेरीवाले पथारीवाल्यांची पुनर्वसन, रामटेकडी येथील कचरा डेपो, मांजरी येथील पिण्याची पाण्याची समस्या, ससूनच्या धरतीवरती अत्याधुनिक रुग्णालयाची आवश्यकता असतानाही मतदारांच्या मूलभूत गरजांकडेच दुर्लक्ष करण्यात आले आहे. पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात खोटे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केली जात आहे, त्यामुळे हडपसर भागातील समस्या सोडवण्यासाठीच मी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. हडपसर मतदार संघाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.

फोटो – हडपसर विधानसभा मतदारसंघातील बीटी कवडे रोड जाधव वस्ती येथे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी मतदारांची भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले

M51 News
Author: M51 News

Leave a Comment

Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
  • AI Tools Indexer
  • Market Mystique
  • Buzz4ai