पुणे – कात्रज येथील आनंदी पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन गाडेकर यांच्या हस्ते, महात्मा गांधीजी आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त लहान मुलांनी महात्मा गांधी,पंडित नेहरुजी यांची वेशभूषा परिधान केली.तसेच काही विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर भाषण आणि गीते सादर केली.काही विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केली.
यावेळी,शाळेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिंदे सर,ज्ञानोबा शिंदे,महेश शिंदे,अशोक कदम,शाळेच्या प्रिन्सिपल सीमा बीरदार मॅडम ,मोठ्या प्रमाणात पालकं वर्ग,विद्यार्थी आणि शिक्षक वृंध उपस्थीत होते.